स्विस बँकेत ‘या’ देशाचा सर्वाधिक पैसा ; भारताचे स्थान घसरले

झुरिच : वृत्तसंस्था – स्विस बँकेत ठेवी जमा करणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत जगभरात ७४ स्थानावर आहे. तर ब्रिटन या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ब्रिटिश धनाढ्य व्यक्ती व उद्योग समूहांच्या सर्वाधिक ठेवी स्वीस बँकेत आहेत. मागील वर्षी भारत ७३ व्या स्थानी होता. यंदा भारताची घसरण झाली आहे. ठेवींवरून देशनिहाय क्रमवारी बँकेकडून जाहीर करण्यात आली आहे.

अमेरिका दुसऱ्या स्थानी

स्वीस बँकेने जाहिर केलेल्या देशनिहाय क्रमवारीनुसार एकूण ठेवीपैकी केवळ ०.०७ टक्के रक्कम या बँकेत भारतीयांची आहे. तर ब्रिटिश खातेधारकांच्या खात्यात सर्वाधिक २६ टक्के रक्कम बँकेत जमा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. स्विस बँकेने जाहिर केलेल्या यादीमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर वेस्ट इंडिज तिसऱ्या, फ्रान्स चौथ्या आणि हाँगकाँग पाचव्या स्थानी आहेत. बँकेत जमा असलेल्या एकूण ठेवीपैकी ५० टक्के ठेवी याच देशांच्या असून उर्वरीत इतर देशांच्या आहेत.

पहिल्या दहामधील देश

स्वीस बँकेने जाहिर केलेल्या ठेवींवरून देशनिहाय क्रमवारीत पहिल्या दहा देशांमध्ये बहामास, जर्मनी, लग्झमबर्ग, केमन आईसलँड आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. बँकेतील एकूण ठेवीपैकी दोन तृतीयांश ठेवी याच देशातील नागरिकांच्या आहेत. मागील वर्षभरात बँकेमध्ये ९९ लाख कोटी ठेवी जमा झाल्या आहेत.

सकाळचा चहा करतो ताण-तणावापासून सुटका, आहेत विविध फायदे

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास शरीरासाठी द्या

दीर्घ श्वास घेणे शरीरासह मेंदूसाठीही महत्त्वपूर्ण