Monsoon Session 2023 | ‘माझा सख्खा भाऊ असला, तरी…’, संभाजी भिडे प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस संतप्त

‘गुरुजी’ उल्लेखावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळी अधिवेशन (Monsoon Session 2023) शेवटच्या टप्प्यात असून आज तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन (Controversial Statement) विरोधकांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session 2023) परखड शब्दात जाब विचारला. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संभाजी भिडे प्रकरणावर सभागृहात निवेदन सादर केले. यामध्ये संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला असून योग्य ती कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. परंतु फडणवीस यांनी संभाजी भिडेंचा ‘गुरुजी’ असा उल्लेख केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अमरावती (Amravati) राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) गुन्हा दाखल केला आहे. अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावतीतील सभेचे व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. माध्यमात जे व्हायरल होतंय, त्याचे व्हॉईस सॅम्पल (Voice Sample) घेतले जातील, असं अमरावती पोलिसांनी (Amravati Police) सांगितल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी संभाजी भिडे यांचा उल्लेख ‘गुरुजी’ करण्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर फडणवीस म्हणाले, आम्हाला ते संभाजी भिडे गुरुजी वाटतात. त्यांचं नावच गुरुजी आहे. (Monsoon Session 2023)

पृथ्वीराज चव्हाण यांचा आक्षेप

देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा करण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, महाराष्ट्रात, देशात कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव जो कुणी निर्माण करेल, त्याच्याविरोधात सरकार कारवाई करेल. अमरावतीला जे काही घडलं, तिथेही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता. त्यावर तुम्ही कारवाई केली. पण तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) बाबतीत बोलताना दुसरं महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की महिमामंडन कुणी करु नये. तुम्ही त्या माणसाला गुरुजी म्हणत आहेत. काही पुरावा आहे का तुमच्याकडे? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उपस्थित केला.

गुरुजी म्हणायला काही हरकत नाही, तुमच्याकडे पुरावा आहे का? तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये (Ferguson College) पीएचडी (PhD) आहे, प्राध्यापक (Professor) होतो असं सागतोय. त्यांची संस्था नोंदणीकृत आहे का? त्याचे अहवाल दिलेत का? जमाखर्च दिला आहे का? हे महिमामंडन नाही का? असे प्रश्न उपस्थित करत पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

माझा सख्खा भाऊ असला तरी…

पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे. आता बाबा कसं आलं याचा मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच गुरुजी आहे. हे मतांचं राजकारण (Maharashtra Political News) चालू आहे. ही मतांची बेगमी आहे. या देशातल्या कोणत्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही. कुणीही असू द्या. माझा सख्खा भाऊ जरी असला, तरी मी कारवाई करेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात