Monsoon Update | पुण्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन महिन्यात दमदार आगमन झाल्यानंतर मान्सूनने (Monsoon) दडी मारली. आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय (Monsoon Active) झाला आहे. गुरुवारी राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगली या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Rain) पडला. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. आज पुण्यासह (Pune) राज्यातील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नंदुरबार, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे चार जिल्हे वगळले तर सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

दरम्यान वाऱ्याचा वेग देखील जास्त असणार आहे. राज्यात ताशी 30 ते 40 किमी प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहणार आहेत. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच मोठ्या झाडाखाली आश्रयाला थांबू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

या तीन दिवशी पुण्यात ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवार) आणि शनिवार (दि.0) पुण्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पण 11. 12 आणि 13 जुलै या तीन दिवशी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे 11 जुलै पासून पुढे तीन दिवस पुण्यामध्ये मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Web Title : Monsoon Update | rainfall-alert-in-pune-for-next-5-days-imd-give-orange-alert-to-this-district

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा