Monsoon Weather Update | कुठे पाऊस, तर कुठे उष्णतेचा कडाका; काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

मुंबई/नवी दिल्ली : Monsoon Weather Update | देशातील तापमानात सातत्याने बदल होत आहे. कुठे पाऊस तर कुठे उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात (North India) उष्णतेचा कडाका कायम आहे. मात्र, दिल्लीसह (Delhi) काही राज्यांमध्ये पाऊस (Monsoon Weather Update) पडत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) आसाममधील (Assam) अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 

हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, मंगळवारी दिल्लीत कमाल तापमान (Maximum Temperature) 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान (Minimum Temperature) 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज (Monsoon Weather Update) वर्तवण्यात आला आहे. यासोबतच दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 जूनपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) उष्णतेने होरपळत आहे.

 

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी (Farmers in Maharashtra) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामे अडकले आहेत. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. कृषी विभागाने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस नसल्याने खते, बियाणे पडून असल्याची स्थिती आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करुन नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात आले आहेत.

राज्यात दरवर्षी सुमारे 150 लाख हेक्टरवर (150 lakh hectares) पेरणी केली जाते. यंदा 18 जूनपर्यंत 1 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत, तरी पाऊस नसल्याने अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. पाऊस लांबला तर कडधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची भीती आहे. दरवर्षी तळकोकणात पावसाची सुरुवात चांगली होते,
मात्र यंदाही तळकोकणात अजूनही पाऊस पाहिजे तसा सक्रिय झालेला नाही.
23 जुलैनंतरच राज्यात चांगला पाऊस (Good Rain) होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जोपर्यंत पाऊस वाढणार नाही तोपर्यंत पेरण्या होणार नाहीत.

 

 

Web Title :  Monsoon Weather Update | imd weather update rainfall 20 june 2023
up bihar delhi know latest weather update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा