130 पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची TMC च्या गुंडांकडून हत्या – HM अमित शहा

बिहार : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चेला उधाण आले असून. भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या सतत टीका टिपणी होता बघायला मिळते. तर यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुरुवारी कुचबिहारमध्ये एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत १३० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली. मात्र कोणतीही कारवाई झालेली नाही. असा गंभीर आरोप अमित शहा यांनी टीएमसीवर केला आहे. यावेळी केला.

दरम्यान, भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. तर अमित शहा यांनी पुढे, म्हटले की, जर पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम म्हणणार नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का? असा सवाल देखील शहा यांनी टीएमसीला उद्देशून यावेळी केला आहे. तसेच निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणतील. केवळ एका विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी असं करत आहेत. असेही ते म्हणाले.

अमित शहा यांनी घोषणा केली की, ”भाजपाच्या सरकार सत्तेवर येताच एका आठवड्यात बंगालमध्ये आयुष्मान योजना लागू केली जाईल. ममता बॅनर्जी मे महिन्यानंतर केंद्राच्या योजना लागू होण्यापासून रोखू शकणार नाहीत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींबरोबर कायम भांडत असतात, सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात देखील त्यांनी वाद घातला. किमान सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यक्रमात तरी त्यांनी राजकारण करायला नको होतं. मात्र त्या कायम भांडत असतात, यामुळे बंगालचं भलं होईल का? असेही गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.