सोलापूर : करमाळाच्या मध्यवस्तीतील महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला, २४ जण ढिगार्‍याखाली, १ ठार १५ जखमी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील करमाळा येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळल्याची धक्‍कादायक घटना घडली असून यामध्ये २२ ते २४ खातेदार आणि कर्मचारी ढिगार्‍याखाली अडकल्याची भिती व्यक्‍त करण्यात आली आहे. या घटनेत १ जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रूग्णालयात पाठविण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार चालु आहेत.

करमाळाच्या मध्यवस्तीत बँक ऑफ महाराष्ट्रची ३ मजली इमारत आहे. तळमजल्यावर बँकेची शाखा आहे. त्याच मजल्यावरील स्लॅब आज अचानकपणे कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्‍नीशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू करण्यात आले असून जेसीबीच्या मदतीने ढिगारा बाजूला काढण्याचे काम चालु असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार चालु आहे. स्लॅब नेमका कशामुळे कोसळला याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय