अयोध्येत मशीद बांधली तर हिंदू नाराज होतील : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी म्हटले की, अयोध्येत जर मशिद बांधायची असेल तर, मशिद हद्दीच्या बाहेर बांधण्यात यावी, कारण अयोध्या हे अध्यात्मिक शहर आहे. त्यामुळे अयोध्येच्या हद्दीत मशिद बंधने हे योग्य ठरणार नाही. तसेच संपूर्ण देशात जर मशिदी बांधल्या तर हिंदू समाजात नाराजी व्यक्त होईल. जसे मक्केत मंदिरं बांधली जाऊ शकत नाहीत तसंच याबाबतीतही आहे, असं प्रवीण तोगडिया म्हणाले.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, अयोध्येमध्ये राम मंदिर हे बांधले गेले पाहिजे परंतु त्यात कोणत्याही राजकीय व्यक्तींचा सहभाग नसावा. मंदिर बांधणं ही एक धार्मिक कार्य असून त्यात ट्रस्टमधील संत, आखाडे आणि धार्मिक व्यक्तींचा सहभाग असला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच तोगडिया यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली की, ज्याप्रमाणं सोमनाथ मंदिरासमोर हमीर सिंह गोहिल यांची समाधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा लावलेली आहे. त्याप्रमाणेच राम मंदिराच्या समोर देखील महंत रामचंद्र दास, महंत अवैद्यनाथ आणि अशोक सिंघल यांचा पुतळा असावा. त्यामुळं त्यांचं जीवन आणि मंदिर उभारणीसाठी झालेल्या आंदोलनाबाबत त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांना माहिती मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा –