पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड गुंडांची ‘हाफ पॅन्ट’ आणि ‘टी-शर्ट’वर काढली ‘धिंड’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या तावडीतून सुटणाऱ्या गँगस्टर संतोष आंबेकरला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर गुन्हे शाखेने संतोषला खंडणीच्या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी त्याला यापूर्वी अनेक वेळा अटक केली होती. मात्र, पुराव्या अभावी तो न्यायालयातून सुटला होता. त्यामुळे नव्या खंडणीप्रकरणात तो जाळ्यात अडकणार असल्याने पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करून पुरावे गोळा करून त्याला बेड्या ठोकल्या.

आंबेकरची नागपूर गुन्हेगारी वर्तुळात मोठी दहशत आहे. त्याच्यावर खंडणी, दरोडा, खून, दंगल भडकावणं अशा अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये यापूर्वी अटक केली होती. गुजरातच्या एका उद्योजकाला जमीन खरेदीच्या प्रकरणात त्याने एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. उद्योजकाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा करून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी याची हवा त्याला लागू दिली नाही.

लोकांच्या मनातील त्याची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी त्याला नेसत्या कपड्यांनीशी त्याच्या घरातून पोलीस चौकीत आणण्यात आले. पोलिसांनी त्याला चप्पल देखील घालण्याची संधी दिली नाही. त्याला अनवाणी पोलीस चौकीत आणून अनवाणीच चालत नेत न्यायालयात हजर केले. पोलिसांनी ही एक प्रकारची धिंडच काढली असल्याचे बोलले जात आहे.

आंबेकरने 2014 मध्ये अंबाझरी पोलीस ठाण्यातच बिल्डरवर रिव्हॉल्वर रोखत 65 लाखांचे चेक लिहून घेतल्याने खळबळ उडाली होती. संतोषला मोक्का न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षाही ठोठावली होती. पण तो तीन वेळा मोक्का मधून निर्दोष बाहेर आला. खंडणी मागणे आणि प्रॉपर्टीसाठी लोकांना धमकावणे यासाठी आंबेकर शहरात चर्चेत असतो.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी