Success Story: ‘आई’ करत होती ‘घरकाम’, ‘वडील’ विकत होते ‘चहा’, परिस्थितीवर मात करुन मुलगा झाला ‘IAS’ अधिकारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – ज्या आई वडीलांची नोकरी गेली त्यांच्या मुलांना जगताना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना कोणीही करु शकतो. परंतू त्यावर मात करुन जेव्हा ती मुलं यशस्वी होतात तेव्हा त्यांचे कौतूक नक्कीच केले जाते. अशीच एक कथा आहे गुजरातमधील सफीन हसनची. त्याने कुटूंबावर संकट असून देखील हार मानली नाही आणि 2017 मध्ये युपीएससीच्या परिक्षेत दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होत 570 वी रँक मिळवली. दृढ संकल्प आणि कष्ट करायची तयारी यामुळे संकटावर मात करता येते हे सफीनने सिद्ध करुन दाखवले.

आई वडिलांची नोकरी गेली –
सफीन हा मध्यम वर्गीय कुटूंबातील मुलगा. त्याचे आई वडील सूरतमध्ये एका डायमंड यूनिटमध्ये काम करुन कुटूंबाचा गाडा ओढत होतो. परिस्थिती तेव्हा वाईट झाली जेव्हा त्यांच्या आई वडीलांची नोकरी गेली. पैसाच नसल्याने कुटूंबाला अनेक रात्री उपाशी पोटी जोपावे लागेल.

आईने केले घरकाम, वडिलांनी विकला चहा –
नोकरी गेल्यावर घर चालवणे साफीनच्या आई वडिलांसाठी मोठे अवघड झाले होते. वडिलांनी इलेक्ट्रीशियनचे देखील काम केले. थंडीच्या दिवसात त्याचे आई वडील चहा आणि अंडे विकत होते.

परिस्थितीवर मात करुन स्वप्न केले साकार –
सफीनला प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी संकटावर मात करावी लागली. परंतू परिस्थितीवर मात करुन त्याने आपली सर्व स्वप्न साकार केली. शालेय शिक्षण झाल्यावर सफीनने नॅशनल इस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

गावातील एका डीएममुळे झाला प्रभावित –
सफीनला यूपीएससी परिक्षा देण्याची इच्छा तेव्हा झाली जेव्हा त्यांच्या गावात एक डीएमने विजिट दिली होती. डीएमचे काम आणि प्रतिष्ठा पाहून सफीनने निश्चित केले की त्याला ही असेच काही तरी करायचे आहे. त्यानंतर त्यांना यूपीएससीच्या सिविल सर्विस परिक्षेची तयारी सुरु केली.

यूपीएससीची तयारी करण्यासाठी साफीन दिल्लीला गेला. दिल्लीत 2 वर्ष राहिला, अभ्यास केले, परंतू पैशांची कमतरता असल्याने त्याला गुजरातच्या एका पोलारा कुटूंबाची मदत घ्यावी लागली. पहिल्या अटेम्प्टनंतर एका अपघातात त्याच्या हाताला मोठी जखम झाली होती त्यामुळे तो काही महिन्यांसाठी रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर पूर्ण जोमाने अभ्यास करुन त्याने दुसऱ्या अटेप्म्टमध्ये यूपीएससी सिविल सर्विस परिक्षा पास केली आणि 570 वी रँक मिळवली. त्याच्या जिद्दीपुढे त्यांनी परिस्थितीला देखील झुकवले.

Visit : Policenama.com