राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे लवकरच मोठी घोषणा करणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणूकीत शरद पवारांना मोठे यश मिळाले. या निवडणूक प्रचारात खारीचा वाटा उचलणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या कष्टाचे चीज झाले. परंतू निवडणूकीच्या निकालानंतर आणि सत्तास्थापनेदरम्यान ते राज्यातील राजकारणात सक्रीय दिसले नाहीत. या बद्दल बोलताना ते म्हणाले की, आपली भूमिका संपली की रंगमंच सोडयचा असतो, एवढंच मला समजतं.

डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले की आपण शरद पवारांसोबतच आहोत. अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी एक अशी परिस्थिती असताना, साहेब ठरवतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण असे म्हणत त्यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे हे स्पष्ट झालं होतं की ते राष्ट्रवादीसाठी काम करणार. आता अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन आपण लवकरच मोठी घोषणा घेणार असल्याचे सांगितले आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 18 डिसेंबरला ते मोठी घोषणा करणार आहेत. अमोल कोल्हेंच्या या फेसबूक पोस्टमुळे राष्ट्रवादी पक्षात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. अनेकांनी ही घोषणा शिवनेरीवरुन होईल अशी शक्यता वर्तवली आहे. तर काहींचं म्हणं आहे की बैलगाडा शर्यतीचा मुद्दा निकाली निघाला असेल. काहींना अपेक्षा आहे की या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कारण फेसबूकवर या पोस्टमध्ये बॅकग्राऊंडचा रंग भगवा आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/