MP Gajanan Kirtikar | मी असं म्हणालोच नाही, सापत्न वागणुकीवरुन गजानन कीर्तिकर यांचा यू-टर्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप (BJP) प्रणित एनडीएमध्ये (NDA) सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी केल्यामुळे युतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परंतु आता गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी त्या वक्तव्यावर घुमजाव केला आहे. आपण असं कोणतही वक्तव्य केलं नसल्याची सारवासारव कीर्तिकर यांनी केली आहे.
ते शब्द माझ्या तोंडी टाकले- कीर्तिकर
भाजपकडून सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, ते माझ्या तोंडात टाकलं. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात भाजप-शिवसेना युतीच (BJP-Shiv Sena Alliance) नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) होतं आणि तिच युती होती. शिंदे (CM Eknath Shinde) साहेबांनी उठाव करत भाजप-शिवसेनेची युती आणली. पुन्हा शिवसेना-भाजपचं सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले. आम्ही पुन्हा एनडीएचे घटक पक्ष झालो, असं गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) म्हणाले.
भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत सगळ काही अलबेल नसल्याचे समोर आलं होतं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत येऊन 11 महिने झाले नाहीत, तोच युतीमध्ये वादाला तोंड फुटण्याचं कीर्तिकरांच्या वक्तव्यातून उघड झालं होतं. पण आता कीर्तिकरांनी यावर घुमजाव केला आहे. आपण असं बोललोच नाही, असा यू-टर्न कीर्तिकर यांनी घेतला आहे.
संजय राऊतांचा निशाणा
दरम्यान, गजानन कीर्तिकर यांच्या यू-टर्नवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
गजानन कीर्तिकर यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे. त्यांनी पुन्हा ऐकावं, जाहीरपणे ऐकावं. आम्हाला सापत्न, सावत्रपणाची वागणूक मिळते,
आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. एनडीएमध्ये आम्हाला मान-सन्मान मिळत नाही. आम्हाला घटक पक्षाचा दर्जा नाही,
हे कीर्तिकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे. त्यांची काय अवस्था झाली, असं राऊत म्हणाले.
Web Title : MP Gajanan Kirtikar | gajanan kirtikar u turn on bjp behaviour says i did not said it
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Sushma Andhare on Tanaji Sawant | ‘हा छोटा ट्रेलर, तुमच्यासाठी स्पेशल…’, ‘त्या’ टिकेवरुन सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांना इशारा
- Police Viral Video | समृद्धी महामार्गावर पोलिसांची ‘समृद्धी’, पोलिसांच्या वसुलीचा व्हिडिओ दानवेंकडून ट्विट
- ACB Trap News | दीड लाखाची मागणी करून 50 हजाराची लाच घेणार्या महिला नायब तहसीलदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात