Sushma Andhare on Tanaji Sawant | ‘हा छोटा ट्रेलर, तुमच्यासाठी स्पेशल…’, ‘त्या’ टिकेवरुन सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare on Tanaji Sawant | ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या भाषणावरुन शिंदे गटाचे (Shinde Group) नेते, आमदार प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहेत. आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी यापूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होता. यावर सुषमा अंधारे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी शिरासाट यांना पोलिसांनी (Sambhajinagar Police) क्लीन चीट दिली आहे. त्याबाबत बोलताना अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गृहमंत्री म्हणून नाही, तर वकिल म्हणून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. तसेच यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Sushma Andhare on Tanaji Sawant)

 

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीने (NCP) एका महिलेला ठाकरे गटाला भाडेतत्त्वावर दिले आहे, असा टोला त्यांनी लगावला होता. तानाजी सावंत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अंधारे म्हणाल्या, हा ट्रेलर असून तुमच्यासाठी स्पेशन एपिसोड घेणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. (Sushma Andhare on Tanaji Sawant)

 

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, माझा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नव्हता. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिक सदस्याही नव्हते. मात्र, तानाजी सावंत म्हणाले मी राष्ट्रवादीकडून भाडेतत्वावर शिवसेनेत (Shivsena) आले. जे सावंत नाकाने वांगी सोलतायंत, त्यांनी हे पाहावं. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), किरण पावसकर (Kiran Pavaskar), उदय सामंत (Uday Samant), प्रकाश सुर्वे (Prakash Surve) हे राष्ट्रवादीकडून आलेले पर्सल आहेत की, परग्रहावरुन आले आहेत. याचं उत्तर तानाजी सावंत यांनी शोधावं. तसेच सावंतजी हा छोटा ट्रेलर आहे, मी तुमच्यासाठी स्पेशल एपिसोड घेऊन येणार आहे, असा इशारा अंधारे यांनी दिला.

 

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

Advt.

परभणी येथील एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांचे नाव न घेता टीका केली होती. सुषमा अंधारे यांना आमच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा पूर्ण सर्च रिपोर्ट आमच्याकडे आहे. आमच्या रणरागिनी अजून शांत आहेत. तुमचं एकदा संपूदे, ज्यावेळेस आमच्या रणरागिनी मैदानात उतरतील, त्यावेळी तुम्हाला तोंड दाखवायाला जागा राहणार नाही.

 

 

 

Web Title :  Sushma Andhare on Tanaji Sawant | tanaji sawant peels eggplant
with her nose direct warning from sushma andahare in response to criticism

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा