MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणाले – ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष नाव (Shiv Sena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केला. यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दोन हजार कोटींचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावर बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. म्हणून अशा माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकत नाही. तसेच निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृतपणे पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, हे राऊतांना (MP Sanjay Raut) माहीत नाही, ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना शिरसाट यांनी संजय राऊत यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्यासोबत केली.

संजय शिरसाट म्हणाले, संजय राऊत (MP Sanjay Raut) जी भाषा वापरत आहेत, त्या भाषेत आम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही. उलट त्यांनी जे मुख्यमंत्र्यां संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते, त्याबाबत त्यांच्यावर गुन्हे (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच कुत्रा पिसाळला तर तर त्याला आपण चावत नाही, तर त्याला इंजेक्शन देतो. त्याप्रमाणे राऊतांना देखील औषध दिले जाईल, असा सूचक इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर

विधीमंडळातील पक्ष कार्यालावर ताबा घेतल्यानंतर शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) आणि पार्टी फंडावर
हक्क सांगणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले,
आमची लढाई ही पक्षाचा फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती.
आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह महत्त्वाचे आहे. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे.
जरी काही लोकांना ती प्रॉपर्टी वाटत असली तरी आमच्यासाठी ती प्रॉपर्टी नाही.
शिवसेना भवनाच्या रस्त्यावरुन आम्ही कधी गेलो तर शिवसेना भवनाला वाकून नमन करु असे
शिरसाट यांनी सांगितले.

Web Title :- MP Sanjay Raut | sanjay raut is mentally disorder man need to be injected says mla sanjay shirsat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhagat Singh Koshyari | पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे परखड मत, म्हणाले- ‘दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे…’

Maharashtra Politics | आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर शिवसेना शिंदे गट घेणार मोठा निर्णय