MP Sanjay Raut | त्यावरही भाजपच्या पोपटांनी बोलावं, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) झालेल्या 14 जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. यावर बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कोरोना काळातही हलगर्जीपणा झाला होता, असा टोला लगावला होता. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, भाजपने (BJP) काही पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू द्या. नोटबंदीच्या (Demonetization) वेळेस हजारोंच्यावर लोक रांगेत उभं राहून मृत्युमुखी पडले होते. तो सदोष मनुष्यवधच होता. त्यावरही भाजपाच्या पोपटांनी बोलावं. कोरोनाच्या वेळेस गंगेत हजारो प्रेत वाहत आली होती. गुजरातमध्ये तर प्रेत जळायला जागाही नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करावी, असे राऊत म्हणले. तसेच राज ठाकरे हे जगाचे नेते आहेत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

काय म्हणाले राज ठाकरे?

खारघर घटनेत सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
यावर राज ठाकरे म्हणाले, कोरोना काळातही सरकारकडून अनेक हलगर्जीपणाच्या घटना घडल्या आहेत.
त्या घटनांमध्येही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. उगाच यात राजकारण करण्याची गरज नाही.
तो कार्यक्रम सकाळी नव्हता करायला पाहिजे होता. धर्माधिकारी यांचा सत्कार राजभवनात झाला असता तर बरं
झालं असतं. पण, तो अपघात आहे, त्याचे राजकारण करण्याची गरज नाही, असे राज ठकारे म्हणाले होते.

Web Title :-  MP Sanjay Raut | sanjay raut replied to raj thackeray statement regarding uddhav thackderay and corona death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही, गैरसमज करुन घेऊ नका – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (व्हिडिओ)

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’

Ajit Pawar | कोण संजय राऊत? उगाच अंगाला का लागावं? अजित पवारांचा टोला

Pune Crime news | पुणे क्राईम न्युज : शिवाजीनगर पोलीस स्टेशन – जंबो कोविड सेंटर – पीएमआरडीए | संजय राऊतचे यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण