MP Srikanth Shinde | मनसे आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा थांबायचे नाव नाही; आता जवळकीचा आणखी एक नवीन प्रसंग

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे चिरंजिव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटील (Raju Patil) यांचा देखील मतदार संघ हाच आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांची भेट चर्चेचा विषय झाली आहे.

 

शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या जोडीच्या भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मुकाबला करण्यासाठी तिघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क येथे आयोजित मनसेच्या दीपोत्सवाला (MNS Deepotsav) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जातीने हजर होते. दीपोत्सवाचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा सत्कार देखील केला होता. त्यामुळे त्यांच्या या प्रेमसंबंधांची वाच्यता सुरु आहे. त्यातच श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील राजकारणात काहीही अशक्य नाही, असे म्हंटले होते. सध्या तरी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप एकत्र आहे. राज ठाकरे यांच्यासोबत युतीचा निर्णय पक्षश्रेष्टठी घेतील, असे महाजन म्हणाले होते.

 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)
यांनी मात्र युतीवर भाष्य करताना तिघांना देखील टोला लावला होता.
राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनाही उद्धव ठाकरेंची दहशत आहे.
त्यामुळे आगामी काळात शिवसेना संपविण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या
विरोधात एकवटण्यासाठी हे तिघे एकत्र येतील, असे दानवे म्हणाले होते.

 

 

Web Title :- MP Srikanth Shinde | mp shrikant shinde visited mns office in dombivli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा