MP Sunil Tatkare | खासदार सुनील तटकरे यांचा शिंदे गट आणि भाजपाला टोला; “बालहट्ट पूर्ण केला पाहिजे…”

पोलीसानामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी शिंदे गटाच्या दोन केंद्रीय मंत्रिपदाच्या (2 Central Ministers) आणि दोन राज्यपाल (Governer) पदाच्या मागणीला बालहट्ट म्हणाले आहे. शिंदे गटाकडून भाजपाकडे केंद्रात दोन मंत्रिपद आणि दोन राज्यपाल पदांची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

“भाजपाला फार मोठा आधार शिंदे गटाकडून मिळाल्याचं भासवलं जात असल्यामुळेच केंद्रातील दोन मंत्रिपदं खरंतर दोन म्हणजे सुद्धा कमी आहेत, जास्त असली पाहिजेत आणि राज्यपाल पदं दोनच का त्यापेक्षाही अधिक असली पाहिजेत., कारण शिंदे गटाकडे या सगळया पदासांठी लायक असणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने, कदाचित यापेक्षाही जास्त मागणी त्यांनी केली पाहिजे आणि त्यांचा हा बालहट्ट भाजपानेही पुरवला पाहिजे.” असे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्याकडे तशी मागणी केली आहे.
त्यांच्या या मागणीवर अमित शहा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि
खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
त्यामुळे त्यांनाच केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- MP Sunil Tatkare | ncp mp sunil tatkares reaction on the shinde groups demand for two ministerial posts in center and a governors post to the bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | ‘न्यायालयाच्या दीर्घकालीन सुट्ट्या कमी करण्याची अपेक्षा योग्य असली, तरी…’ – जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय

Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

Actress Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीने ठोठावले केरळ उच्च न्यायालयाचे दरवाजे, जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी