MP Sunil Tatkare | २००९ ला शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढणार होते, मग आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? : तटकरे

गडचिरोली : MP Sunil Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) गडचिरोली येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे. २००९ मध्ये शिवसेना-एनसीपी (Shiv Sena-NCP) एकत्र निवडणूक लढणार होते, असा गौप्यस्फोट करत तटकरे यांनी, मग आम्ही भाजपासोबत (BJP) जाऊन काय चूक केली, असा सवाल केला आहे.

सुनील तटकरे म्हणाले, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकदा आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र काही कारणामुळे नंतर ते घडले नाही. २००९ नंतर पुढे २०१४ मध्येही भाजपाला पाठिंबा दिला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली. मग आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली?

तटकरे (MP Sunil Tatkare) म्हणाले, अजितदादा यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले.
मात्र आमचेच काहीजण आज टीका करत आहेत, काही जणांना नैराश्य आले आहे. ईडीच्या भीतीने आम्ही भाजपसोबत
गेलो अशी टीका होतेय. स्वतः च्या सावलीला घाबरणाऱ्यांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे?

तटकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी दोन नंबरला आहे. याचा अर्थ अजितदादांनी
घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजितदादा यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेच्या मनात आहे.

उपस्थिती पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना आवाहन करताना सुनील तटकरे म्हणाले, देशात नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, सत्तेत आलो कारण जनतेची, त्यांच्या विकासकामांची
आम्हाला काळजी आहे. या भूमिकेतूनच आपले नेते अजितदादा यांनी निर्णय घेतला.
मात्र यावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे फार काळ टिकत नाही.
या भावनिक राजकारणाला थारा न देता कामाच्या रुपाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजितदादा पवार काम करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार