MP Supriya Sule | किरीट सोमय्या काय ED चे प्रमुख आहेत का? खा. सुप्रिया सुळेंचा सवाल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  MP Supriya Sule | भाजपचे (BJP) जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यां (Kirit Somaiya) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर दोन वेळा गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे राज्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमय्यांसह भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी सुळे या औरंगाबाद येथे पत्रकार परिषद बोलत होत्या.

केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत. किरीट सोमय्या हे सीबीआयचे (CBI) प्रमुख आहेत का? की ED चे डायरेक्टर आहेत का? असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे.
आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. किरीट सोमय्या हे का. सीबीआय प्रमुख आहेत का किंवा ईडीचे डायरेक्टर आहेत का? केंद्रीय यंत्रणा चलन फाडणाऱ्या पोलिसांसारखे वाटत आहेत.
यांच्यातून काही निघणार नाही, मात्र आम्ही लढत राहणार आहोत.
सत्य कधी पराजित होत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

त्या दरम्यान बोलताना सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नांवरही उत्तर दिलं आहे.
तुमची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा सवाल विचारला असता, त्यावेळी सुळे म्हणाल्या की, ‘जेंडर ट्रॅपमध्ये अडकायचे नाही.
चांगलं काम करणारा व्यक्ती मुख्यमंत्री असावा’ अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

 

Web Title : MP Supriya Sule | is bjp leader kirit somaiya the head of ed ask ncp mp supriya sule in aurangabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा; म्हणाले – ‘…त्या FIR मध्ये अजित पवारांचं नाव’

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Solapur Crime | करमाळा बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला तब्बल ‘एवढया’ दिवसाची पोलिस कोठडी