MP Supriya Sule On BMC Election | ‘मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार’ – खासदार सुप्रिया सुळे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – MP Supriya Sule On BMC Election | गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या (BMC Mayor) सत्तेवरुन भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. सध्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असली तरी आगामी पालिकेत भाजप सत्तेवर येणार असं भाजप नेते म्हणत आहेत. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्या धुळे (Dhule) येथे बोलत होत्या.

 

”मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल,” असा ठाम विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधत होत्या. त्यावेळी त्यांना मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येईल ? काय वाटत ? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर असेल असं भाकीत केलं आहे. (MP Supriya Sule On BMC Election)

 

”अर्थातच शिवसेनेचा महापौर होणार हे स्पष्टच आहे. मुंबई महापालिकेकडून कोविड काळात जे काम झालंय याचा कोणीच हात धरु शकत नाही.
या कामाचं कौतुक फक्त या देशात नव्हे तर जगानं केलंय. त्यामुळं महाविकास आघाडीसमोर कोणी टिकत नाही,”
असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MP Supriya Sule On BMC Election | mayor of bmc will be of shiv sena only ncp mp supriya sule

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा