Dilip Walse Patil | ‘चूक राष्ट्रवादीची असेल तर…’ पुण्यातील राड्यानंतर गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) या काल पुण्यात आल्या होत्या. स्मृती इराणी यांच्या हस्ते अमित शहा (Amit Shah) यांच्या आयुष्यावरील एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांनी आंदोलन (Agitation) केले. यानंतर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यातून मोठा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) यांना मारहाण (Beating) करण्यात आली. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे (FIR) दाखल होतील, असे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले.

 

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, चूक कोणाची आहे, त्याप्रमाणे जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि भाजपची असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील.
भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणं ही आक्षेपार्ह बाब आहे.
त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत आहे ती कारवाई होईल असे वळसे पाटील यांनी सांगितले.

तिन्ही पक्षांनी एकत्र काम केलं पाहिजे
दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, मला वाटतं की काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) हे तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत.
एखाद्या लहान मोठ्या प्रश्नावरुन मतभेद झाला तर लगेच त्याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) गडबड आहे, असं काढायचं कारण नाही.
त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील. परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला भाजपसोबत लढायचं आहे.
त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र काम केलं पाहिजे.

 

 

Web Title :- Dilip Walse Patil | Maharashtra home minister dilip walse patil on pune fight between ncp woman leader and bjp leader smriti irani programme

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा