महाविकास आघाडीमध्ये MPSC च्या निर्णयावरून ‘बिघाडी’ ; नेत्यांची मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसेवा परीक्षांच्या तारखासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसताना पाहायला मिळते. एमपीएससीच्या निर्णयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही परीक्षा पुढे ढकलू नये. परीक्षा घ्याव्या अशी विनंती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळत निर्णय घेतल्याने नाराजी उमटली आहे.

दरम्यान, MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर होताच मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आले होते. तर MPSC ची परीक्षा पुढे ढकलू नये अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वड्डेटीवार, प्रदेशयुवक अध्यक्ष सत्यजित तांबे, आणि आमदार रोहित पवार यांनी केली होती. तसेच काहींनी सामाजिक माध्यमाद्वारे प्रतिक्रिया देऊन उघडपणे एमपीएससीच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सर्व नेत्यांची विनंती फेटाळून लावत, विनंतीस केराची टोपली दाखवल्याचं म्हटले जात आहे. याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे आणि यावरून नाराजी मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून जनतेशी संवाद साधत एमपीएससीच्या निर्णयाबद्दल घोषणा केली. रविवार १४ मार्च रोजी होणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला होता. त्यांना आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की होत. ही परीक्षा पुढच्या आठडाभरात निश्चित होईल.