MPSC Exam 2022 | एमपीएससीच्या ‘गट क’ वर्गातील पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MPSC Exam 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) गट ‘क’ वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षासांठीचे प्रवेशपत्र दिनांक 25 मार्च रोजी जारी करण्यात आलं आहे. याबाबत माहिती एमपीएससीने (MPSC Exam 2022) आपल्या वेबसाईटवरुन दिली आहे. सदरची परीक्षा 3 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. दरम्यान, पात्र उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करावं असं आवाहन आयोगाकडून करण्यात आलं आहे.

 

एमपीएससीने जाहीर केलेली ही परीक्षा 900 जागांसाठी होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत ही 22 डिसेंबरपर्यंत होती. आता ही परीक्षा 3 एप्रिलला होणार असून त्यासंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हेही आयोगाकडून सुचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आयोगाने सांगितलं आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेपूर्वी दीड तास हजर रहावं असं देखील सांगण्यात आलं आहे. (MPSC Exam 2022)

 

 

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचं निवेदनातून स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यामध्ये काही अडचणी आल्यास त्याबाबत आयोगाने हेल्पलाईन क्रमांक आणि वेबसाईटची माहिती शेअर केली असून त्यावर उमेदवारांनी संपर्क करण्याचे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे.

 

Web Title :- MPSC Exam 2022 | Issuance of admission test for MPSC’s ‘Group C’ class pre examination; Exam will be held on this date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘राष्ट्रवादी-शिवसेना माझा घातपात करणार असल्याचं एसपीच बोलले’; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

 

Pune Crime | पुणे-मुंबई महामार्गावर अवैध मळी टँकरवर कारवाई, 23 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

Modi Government | गरीबांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता 30 सप्टेंबरपर्यंत घेवू शकतात ‘या’ योजनेचा लाभ