MPSC Result | एमपीएससीचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर (MPSC Result) करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) हा 633 मार्कांसह राज्यात पहिला (MPSC Result) आहे आहे. तर शुभम पाटील (Shubham Patil) हा 616 गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे. मुलींमध्ये सोनाली म्हात्रे (Sonali Mhatre) पहिली असून ओव्हरऑल ती तीसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक (industries and Deputy Director) या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पहिला आला होता.

 

उपजिल्हाधिकारी (Deputy Collector), पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent), तहसीलदार (Tehsildar) यासाह 20 पदांच्या 405 जागांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाने (Maharashtra Public Service Commission) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्यासाठी 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे, या काळात उमेदवारांनी आपला पसंतीक्रम सादर करावा, असं आवाहन आयोगाने केले आहे.

 

 

या परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणी करताना काही
उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो,
काही उमेदवार अपात्र ठरू शकतात असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- MPSC Result | MPSC Result Declared, Sangli’s Pramod Chowgule topped the state for the second time in a row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | उरुळी कांचन येथील दारु अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Crime News | नूडल्सचं आमिष दाखवून शेजाऱ्याकडून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

MC Stan | बिग बॉस 16 चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात