MPSC Student Protest In Pune | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा; मागणीसह पुण्यातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे (MPSC Student Protest In Pune). एमपीएससी परिक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम आयोगाने लागू केला होता. त्याविरोधात एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी यांनी आंदोलन सुरू केले आहे (MPSC Student Protest In Pune). नवीन अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याच पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ या नवीन वर्षात संपूर्ण अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम आयोगाकडून लागू करण्यात आला (MPSC Student Protest In Pune). अचानक घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि त्यांची कित्येक वर्षांची मेहनत वाया जाईल. त्यांना पुन्हा नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा प्रमुख मागणीसह विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून एमपीएससीच्या परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसतो आहे. यामुळे एमपीएससी विरोधात हे विद्यार्थी एकवटले आहेत.
कित्येक वर्ष आयोगाला पूर्ण वेळ अध्यक्ष देखील नव्हता. त्यामुळे निवड होऊन देखील विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी वाट पाहवी लागत होती.
गेल्या काही वर्षांपासून एमपीएससी विरोधात वारंवार आंदोलन करण्यात येत आहे.
तरीदेखील सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत नसल्याचा सूर विद्यार्थ्यांमध्ये आहे.

दरम्यान, मोल मजुरी करून आई-बाप आपल्या लेकराला मोठ्या शहरात अभ्यासासाठी पाठवतात.
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात
येतात. त्यात मागील काही वर्षांपासून वारंवार एमपीएससीच्या विरोधात आंदोलन केले जात असल्याने प्रश्नचिन्ह
पालक वर्गाकडून याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title :- MPSC Student Protest In Pune | the new curriculum should be implemented from 2025 protest of mpsc students in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा भाजप खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा

Amit Deshmukh | भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं बोलले अमित देशमुख; म्हणाले…