बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’ सुजित कुंभारचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयित ‘एमआर’चा मंगळवारी (दि.१६) दुपारी एकच्या सुमारास सिव्हीलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सुजित दिलीप कुंभार (वय २९, रा. उत्तर तांबवे, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. तेरा दिवस त्याची मृत्यूशी चाललेली झुंज मंगळवारी संपुष्टात आली. उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1076fed9-d151-11e8-b960-8d9ea89e8136′]

सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकला होता. त्यानंतर बेकायदा गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. याप्रकऱणी पोलिसांनी डॉ. रूपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले, विट्यातील डॉ. अविजित महाडिक, एमआर सुजित कुंभार यांना अटक केली होती. तर यातील एक संशयित स्वप्नील जमदाडे अद्यापही पसार आहे. यावेळी डॉ. रूपाली आणि डॉ. विजयकुमार यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर एमआर सुजित कुंभार याला दि. २२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

‘फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन आले का ?’ : नरेंद्र मोदींचे भाऊ 

कुंभार याने डॉ. रूपालीला गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सर्वच संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दि. २९ सप्टेंबर रोजी यातील सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. सुजित कुंभारची येथील मध्यवर्ती जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1a70b433-d151-11e8-9643-d17ab5be1cbb’]

कारागृहात असताना दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे सुजित कुंभारची तब्येत अचानक बिघडली. त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात (सिव्हील) दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याच्याजवळ त्याचे कुटुंबियही होते. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

कोथळे खून प्रकरण : कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित : अ‍ॅड. उज्ज्वल निकम 

सुजित कुंभार दि. २९ सप्टेंबर रोजी कारागृहात दाखल आला होता. त्यानंतर त्याची कोणतीही तक्रार नव्हती. मात्र दि. ४ ऑक्टोबर रोजी पहाटे त्याला रक्ताची उलटी झाल्याने तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले होते असे कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

[amazon_link asins=’B07CXZVSVY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2c75bda2-d151-11e8-a072-c3a099169f35′]

दरम्यान, सुजित कुंभारचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर कारागृह प्रशासनासह वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सिव्हीलकडे धाव घेतली. यावेळी सर्व अधिकार्‍यांनी मिरजेतील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.