Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या अभिनयाबरोबरच लूकने चाहत्यांचे मन जिंकते. सोशल मीडियावर मृणाल नेहमीच अनेक लूक मधील फोटो शेअर करत असते. नुकताच मृणालने शेअर केलेल्या एथनिक लूक मधील फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Mrunal Thakur)

मृणाल ने instagram वर फोटो शेअर केले असून यामध्ये तिने पेस्टल पिंक कलरचा एथनिक ड्रेस स्टोन आणि पर्लची ज्वेलरी कॅरी केली आहे. त्याबरोबरच मृणालने गोल्डन चैन चोकर आणि गोल्डन झुमका ही परिधान केला आहे. यावर मृणाल ने न्यूड लिपस्टिक, मस्करा, ब्लॅक आयलायनर आणि आयशाडो लावत तिने आपला मेकअप पूर्ण केला आहे. मृणालचे हे लूक चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे.

मृणालचे हे लूक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट देखील केले आहे. मृणालच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव पाहायला मिळत आहे. मृणालच्या वर्कफ्रंट बोलायचे झाल्यास ती 2022 या वर्षात तिचे ‘जर्सी’ आणि ‘सीतारामन’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता प्रेक्षक मृणालच्या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Mrunal Thakur | mrunal-thakur-in-a-pastel-pink-ethnic-dress-says-something-special-see-latest-photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान