home page top 1

MS धोनी बनला ऑनलाइन सर्च होणार्‍यांपैकी सर्वात घातक ‘सेलिब्रिटी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याची लोकप्रियता केवळ भारतातच नसून संपूर्ण जगभरात आहे. त्यामुळे अनेकवेळा त्याचे नाव गुगलवर सर्च केले जाते. मात्र आता यापुढे इंटरनेटवर धोनीचे नाव सर्च करणे तुम्हाला महाग पडू शकते. अनेकदा नागरिक लवकर सर्च होण्यासाठी किवर्डचा वापर करत असतात. मात्र आता या पद्धतीमुळे तुमच्या कम्प्युटरला किंवा मोबाईलला धोका निर्माण होऊ शकतो.

इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी McAfee ने याबाबत एक रिपोर्ट सादर केला असून यामध्ये हि माहिती देण्यात आली आहे. तुम्ही धोनी शब्द सर्च केल्यावर तुम्हाला अनेक लिंक दिसून येतात. मात्र यामध्ये बऱ्याच लिंक या बनावट असतात. या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या कॉम्प्युटरवरील डेटा हॅक केला जाऊ शकतो. यामुळे तुमची महत्वाची माहिती, बँकेची माहिती, आर्थिक नुकसान यांसारखी महत्वाची माहिती चोरी होऊ शकते.

धोनीच्या विविध लिंक हॅकर्सनी तयार केल्या असून यामार्फत चाहत्यांची फसवणूक केली जाऊ शकते. या बनावट लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊन ते तुमची फसवणूक करू शकतात. हॅकर्सनी यासाठी काही सेलिब्रेटींच्या देखील किवर्डचा वापर केला असून सनी लिओनी, गौतम गुलाटी आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाचा देखील गैरवापर करून हॅकर्स फसवणूक करत आहेत.

मात्र सध्या धोनी हा किवर्ड फार लोकप्रिय असून यामाध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करत आहेत.
दरम्यान, यासाठी तुम्ही सर्च करताना सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे या संस्थेने सांगितले असून कोणत्याही वेबसाइटवरून सर्च न करता अधिकृत वेबसाईटवरूनच सर्च करावे.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like