सचिनचा 100 शतकांचा ‘रेकॉर्ड’ मोडू शकतो, पण धोनीचा नाही, गौतम गंभीरनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘धोनीचा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड शक्यतो कोणी मोडू शकणार नाही’ असे मत माजी क्रिकेटपट्टू गौतम गंभीर याने व्यक्त केले. भारताचा सर्वात कामायाबी कर्णधार आणि भारतीय क्रिकेटमधील एक नावाजलेला खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

गंभीर एका क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमात बोलताना म्हणाला, ‘जर तुम्ही रेकॉर्डस् बद्दल बोलत असाल तर असा एक रेकॉर्ड आहे जो शक्यतो कोणी मोडू शकणार नाही, आणि तो रेकॉर्ड म्हणजे एमएस धोनीने मिळवलेल्या तीन आयसीसी ट्रॉफी’. गंभीरने 2011 च्या वोर्ल्डकप मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 109 रन काढले होते.

गंभीर पुढे म्हणाला, दुसरा कोणता कर्णधार एवढी मोठी कामगिरी करू शकेल असं मला तरी वाटत नाही. टी-20 असेल, आयसीसी ट्रॉफी असेल किंवा 2011 चा वर्ल्ड कप असेल हे नेहमीच धोनीची आठवण करून देत राहील.

39 वर्षाच्या धोनीने आत्तापर्यंत भारताला त्याच्या कॅप्टन पदाच्या कारकिर्दीत तीन आयसीसी वर्ल्डकप जिंकून दिले. त्याने 2007 मध्ये टी -20 वर्ल्डकप, 2011 मध्ये वर्ल्डकप आणि 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली. तसेच त्याने भारताला आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये नंबर वन बनवलं होतं.

गंभीर म्हणाला, मला असं वाटतं की 100 शतकांचा रेकॉर्ड भले कोणी मोडू शकेल पण धोनीने तो कर्णधार असताना ज्या तीन ट्रॉफी भारताला दिल्या तशी कामगिरी पुन्हा कोणी करू शकेल असं वाटत नाही.

धोनीने आत्तापर्यंत 90 टेस्ट मॅचच्या 144 डावात 38.09 च्या रनरेट ने 4876 रन बनवले. टेस्ट मध्ये त्याच्या नावावर 6 शतक, 33 अर्धशतक आहेत तर त्याचा सर्वोच्च स्कोअर 224 इतका राहिला आहे.

तर, 350 वनडे मॅचच्या 297 डावात त्याने 50.57 च्या रनरेट ने 10773 रन बनवले. वनडे मध्ये त्याच्या नावावर 10 शतक, 73 अर्धशतक आहेत.

जगातला सर्वश्रेष्ठ फिनिशर मानल्या जाणाऱ्या धोनीने 98 टी-20 मॅच मध्ये 37.60 च्या रनरेट ने 1617 रन काढले. यामध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतक आहेत. आणि त्याचा सर्वोच्च स्कोअर 56 इतका होता.