निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांचा अंबाती रायडूबाबत ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : वृत्तसंस्था – वेस्टइंडीज दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तिन्ही प्रकारच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच कर्णधार असणार असल्याची घोषणा अखिल भारतीय राष्ट्रीय निवड समितीने घोषीत केले. विश्वचषकानंतर वेस्टइंडीज दौऱ्यावर विराट कोहलीला आराम देण्यात येईल असे वाटत होते. भारत वेस्टइंडीजमध्ये टी-२०, कसोटी आणि एक दिवसीय सामने खेळणार आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघाच्या घोषणेनंतर प्रसाद यांना विश्वचषक स्पर्धेत अंबाती रायडूला का डावलण्यात आले, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना प्रसाद म्हणाले, ज्यावेळी अंबाती रायडूला टी-२० सामन्यातील प्रदर्शनावरून वनडे संघामध्ये निवडण्यात आले होते. त्यावेळी निवड करणाऱ्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर निवड समितीने अंबाती रायडूला घेण्यावरून बराच विचार केला.

अंबती रायडू यो-यो फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाला म्हणून आम्ही त्याला एक फिटनेस कार्यक्रम दिला होता. मात्र, काही सामन्यामध्ये तो अपयशी राहिल्याने त्याला विश्वचषक स्पर्धेच्या संघामध्ये निवडण्यात आले नाही. यामुळे निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे चुकीचे असल्याचे प्रसाद यांनी म्हटले.

मयांक अग्रवालला संघात घेण्याविषयी सांगताना प्रसाद म्हणाले, विजय शंकर जखमी होता तर केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली होते. या परिस्थितीमध्ये संघाला ओपनरची गरज होती. त्यामुळे रायडूच्या जागेवर मयांग अग्रवाल याला इंग्लंड येथे पाठवण्यात आले. निवड समितीने रायडूच्या ऐवजी विश्वचषक स्पर्धेच्या संघामध्ये विजय शंकरला संधी दिली होती. यावर बोलताना प्रसाद यांनी, विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारे करु शकतो.

संघामध्ये अंबाती रायडू हा राखीव फलंदाज होता. एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याच्या जागी राखीव खेळाडूला खेळवण्यात येते. मात्र, शिखर धवन आणि विजय शंकर हे जखमी झाल्यानंतर त्यांच्या जागी मयंक अग्रवाल आणि ऋषभ पंतला घेण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायडूने अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.

आरोग्यविषय वृत्त –