Multibagger Penny Stock | केवळ 2 वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मल्टीबॅगर शेयरमधून कमावले 16 लाख रुपये; जाणून घ्या कसे ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Penny Stock | शेअर बाजारात चढ – उतार होत असतो, कधी एखाद्या कंपनीचे शेअर्स अचानक वर जातात तर कधी खाली येतात. अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकने फक्त 2 वर्षात 1500 पट रिटर्न दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने या काळात गुंतवणूक केली असती तर त्याला 1500 पट नफा मिळाला असता. (Multibagger Penny Stock)

 

मिंटच्या रिपोर्टनुसार, Kwality Pharma च्या शेअरची किंमत दोन वर्षांत 25.55 रुपये प्रति शेअरवरून 404.55 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांत शेअर 593 रुपयांवर पोहोचला होता, तो 404 रुपयांपर्यंत खाली आला आहे, म्हणजे जवळपास 30 टक्के.

 

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या एका महिन्यात क्वालिटी फार्माच्या शेअरची किंमत 454.25 रुपयांवरून 404.55 रुपयांपर्यंत घसरली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की एका वर्षात स्टॉकने 675 टक्क्यांपर्यंत नफा कमावला आहे. मार्च 2021 मध्ये तो 52.10 रुपये प्रति शेअरवरून वाढून मार्च 2022 मध्ये 404.55 रुपये प्रति शेअर झाला. (Multibagger Penny Stock)

 

Kwality Pharma शेअर प्राईस हिस्ट्री

एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 7.75 लाख रुपये झाले असते.

दुसरीकडे, सहा महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती तर, हा रिटर्न केवळ 70,000 रुपये झाला असता,
म्हणजेच सुमारे 30,000 रुपये गमावले असते.

जर एखाद्याने 2 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 25.55 रुपयांच्या किमतीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते,
तर त्याला आज 16 लाख रुपये मिळाले असते.

या शेअरने 1,110.30 रुपयांची आतापर्यंतची सर्वोच्च किंमत गाठली आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock news multibagger share became rs 16 lakh on investment of rs 1 lakh in just 2 years

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा