Multibagger Stocks | ‘हा’ फॅशन स्टॉक देत आहे बंपर रिटर्न! 6 दिवसात 29 रुपयांवरून 42 रुपयांची झाली शेयरची किंमत, तुम्ही खरेदी केला का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stocks | जर तुम्ही देखील शेअर बाजारात (Stock market) स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत फक्त 6 व्यवहारांच्या सत्रांमध्ये 29 रुपयांवरून 42 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांत प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये प्रचंड विक्री होऊनही, काही स्मॉल कॅप शेयरनी त्यांच्या शेयरधारकांना (shareholders) चांगला रिटर्न दिला आहे. (Multibagger Stocks)

 

भक्ती जेम्स अँड ज्वेलरी (Bhakti Gems and Jewellery) चा हा शेयर आहे. या फॅशन स्टॉकची किंमत 29.05 रुपयावरून (19 जानेवारी 2022 रोजी BSE वर बंद किंमत) आज मागील 6 व्यवहाराच्या सत्रांमध्ये 42.65 रुपये झाली आहे. या कालावधीत सुमारे 46 टक्के वाढ नोंदण्यात आली आहे.

 

भक्तीरत्न आणि ज्वेलरी शेअर प्राईज हिस्ट्री (Bhakti Ratna and Jewelery Share Price History)
भारतीय शेअर बाजारातील कमजोरी असूनही, या फॅशन स्टॉकने 5 पैकी 3 सत्रांमध्ये 5 टक्के अपर सर्किट दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शेअर आपल्या शेयरधारकांना मोठा रिटर्न देत आहे. गेल्या एका महिन्यात, तो रू. 14.71 वरून रू. 42.65 पर्यंत वाढला आहे, तो या कालावधीत 190 टक्क्यांनी वाढला आहे. (Multibagger Stocks)

त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत, स्टॉक रू. 17.85 वरून रू. 42.65 पर्यंत वाढला आहे, या काळात जवळपास 140 टक्के वाढ झाली आहे.
भक्तीरत्न आणि ज्वेलरीच्या शेअरच्या प्राईज हिस्ट्रीनुसार, त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 91.95 आहे जो त्याने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केला होता तर 52 आठवड्यांचा नीचांक 10.60 होता जो नुकताच नोव्हेंबर 2021 मध्ये झाला होता. या फॅशन कंपनीचे प्रति शेअर बुक व्हॅल्यू 15 पेक्षा थोडी जास्त आहे, तर त्याचे ट्रेड व्हॉल्यूम 2,34,295 आहे, जे त्याच्या 20 दिवसांच्या सरासरी ट्रेड व्हॉल्यूम 3,86,535 पेक्षा कमी आहे.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | multibagger stock 2022 fashion stock gave 46 percent return in 6 sessions check share price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police | राज्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आता 12 तासांऐवजी 8 तास ड्युटी

 

Urvashi Rautela Latest Video | उर्वशी रौतेलाच्या अजब अंदाजानं चाहते झाले घायाळ, व्हिडिओ पाहून चाहत्यांना आली ‘रेखा’ची आठवण

 

Bazar24Store मध्ये पुण्यातील महिलांना घरबसल्या हजारो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या