चिंताजनक ! धारावी नाही तर मुंबईतील ‘हा’ भाग आता ‘कोरोना’ हॉटस्पॉट, वेगाने वाढतेय रुग्ण संख्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आहेत. शहरातील धारावी हा आजपर्यंतचा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील या भागापेक्षा मुंबई उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबई उपनगरातील अंधेरी आणि दहिसर हे प्रभाग कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट बनू लागले आहेत.

अंधेरी पूर्व भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या या परिसरामध्ये 4076 कोरोनाचे रुग्ण आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील कोरोनाचे सुरुवातीचे हॉटस्पॉट असलेल्या धारावी, वरळी, कुर्ला, भायखळा या प्रभागातही अद्याप 4000 रुग्ण संख्या आहे. इतक्या झपाट्याने अंधेरी पूर्वेत कोरनाग्रस्त वाढलेत. तर दुसरीकडे मुंबईत जवळपास दोन आठवड्यांपूर्वी जी उत्तर वॉर्ड म्हणजे धारावी, माहीम, दादर या परिसरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर आर उत्तर वॉर्डात म्हणजेच दहिसरमध्ये कोरोनाचे संक्रमण कमी प्रमाणात असल्याने रुग्णांची संख्या कमी होती.

मात्र, आता हे चित्र बदलले असून या प्रभागात 13 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. नव्या रुग्णवाढीचा दर 5.6 टक्क्यांवर पोहचला आहे. तर दादर, भायखळा या ठिकाणी आता 40 दिवसांनी रुग्ण दुप्पट होत आहेत. या क्षेत्रात नव्या रुग्णवाढीचा दर चार टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणजेच या भागात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा दर कमी
मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 27 मे रोजी मुंबईत नवीन कोरोना बाधित रुग्णांची दैनंदिन वाढ सरासरी 5.17 टक्के होती. ती 2 जून रोजी 3.64 टक्के झाली. तर 15 जून रोजी 2.49 टक्के झाली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी देखील आता 28 दिवसांवर गेला आहे. म्हणजेच मुंबईत दोररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण कमी झालं आहे.