Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत बुधवारी दिवसभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडच्या मालवणी येथील एक चार मजली इमारतीचा (mumbai building) काही भाग कोसळला. त्यात 11 जणांचा मृत्यु झाला असून 7 जण जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अजूनही सुरु आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही लोक असण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मालाडमधील मालवणी गेट क्रमांक 8 येथील अब्दुल हमीद रस्त्यावरील ही इमारतीचा काही भाग कमकुवत असल्याचे लक्षात आल्यावर तेथील नागरिकांचे स्थलांतर सुरु करण्यात आले. त्याचवेळी रात्री अकरा वाजता ही दुर्घटना झाली. साहिल सर्फराज सय्यद (वय 8), अरीफा शेख (वय 8), जॉन इर्रना (वय 13 ) अशी मृतांमधील ओळख पटलेल्या लोकांची नावे आहेत.

File photo

 

मारीकुमार हिरंगना (वय 30), धनलक्ष्मी बेबी, सलीम शेख (वय 49), रिजवाना सय्यद (वय 33), सूर्यामणी यादव (वय 39), करीम खान (वय 30) गुलजार अहमद अन्सारी (वय 26) अशी जखमींची नावे आहेत.
या इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 17 जणांना वाचविण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

इमारतीच्या ढिगार्‍यापर्यंत जाण्यास जागा चिंचोळी असल्याने जेसीबी, अ‍ॅम्बुलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचण्यात अडचणी आल्या. शेजारच्या इमारतीवर कोसळलेल्या ढिगार्‍याखाली काही कोणी आहेत का याचा सध्या शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Advt.

Nashik Election | नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा, मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात 16,379 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 95.45%

नेपाळमध्ये पतंजलीच्या कोरोनिल किटच्या विक्री आणि वितरणावर का लावला गेला प्रतिबंध?

‘बारिश क्या हुई मिट्टी की फितरत बदल गई…’ अमृता फडणवीसांचा शायरीतून शिवसेनेला टोला

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या व खंडणी मागणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार; पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या निवेदनानंतर पोलिसांकडून आश्वासन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा