Mumbai Crime | राजस्थान, मध्य प्रदेशातून 10 आरोपींना पकडून केला 7 कोटींचा ऐवज हस्तगत; सोन्याचे दागिने घेऊन साथीदारांसह नोकर झाला होता पसार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Crime | सराफी दुकानातून तब्बल 8 कोटी रुपयांचे दागिने (Jewelry) व रोकड (cash) घेऊन पसार झालेल्या नोकर व त्याच्या साथीदारांना मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाच्या पथकाने तब्बल 10 दिवस राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) शोध घेऊन त्यातील 14 जणांना अटक (Arrest) केली. त्यांच्याकडून 7 कोटी 12 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला (Mumbai Crime) आहे.

 

रमेश देवरामजी प्रजापती (वय -21), हिंमतसिंह मोहनसिंह बालिया (वय 30, रा. बालंदा. ता. जि. सिरोही, राजस्थान), लोकेंदर पुरणसिंह राजपुत (वय 25), प्रल्हादसिंह डुंगरसिंह चौहान (वय 26), गणेशकुमार हिराराम देवासी (वय 21), कैलासकुमार मंगलाराम तुरी भाट (वय 22) किसन प्रल्हाद चौहान (त्रिगर) (वय 21), तसेच त्यांच्याकडून चोरीचा माल स्वीकारणारे श्यामलाल मोहनला सोनी (वय 58), विक्रमकुमार सोगाराम मेघवाल (वय 22) उत्तम पन्नाराम धांची (वय 28, सर्व रा. राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Mumbai Crime)

 

याप्रकरणी खुशाल रसिकलाल टामका Khushal Rasiklal Tamka (वय 48) यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात (Lokmanya Tilak Marg Police Station) फिर्याद दिली होती. त्यांचे जेनिशा ज्वेल्स आर्ट (Jenisha Jewels Art) या नावाने भुलेश्वर (Bhuleshwar) येथे सोन्याचा व्यवसाय (Gold Business) आहे. त्यांच्या कार्यालयातील नोकर गणेश कुमार व त्यांचा साथीदार रमेश प्रजापती यांनी 14 जानेवारी रोजी कार्यालयातील तिजोरीत ठेवलेले विविध सोन्याचे दागिने व 8 लाख 57 हजार 90 रुपये असा एकूण 8 कोटी 19 लाख 67 हजार 871 रुपयांचा माल तसेच कार्यालयातील सीसीटीव्हीच्या डिव्हिआरसह चोरुन नेला होता.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पायधुनी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त समीर शेख (ACP Sameer Shaikh) व पोलीस निरीक्षक ओम वंगाटे (Police Inspector Om Wangate) यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक कदम (API Kadam), उपनिरीक्षक लाड (PSI Lad), उगले, लहामगे, विनोद पवार यांचे पथक तयार करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बनकर, दिघे व पोलीस अंमलदार मुन्ना सिंग यांचे सायबर पथक (Cyber Squad) तांत्रिक तपासासाठी नेमण्यात आले. या दोन्ही पथकांनी तांत्रिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील सिरोही येथील रेवदर बसस्थानक येथे 18 जानेवारी रोजी रमेश प्रजापती याला ताब्यात घेतले. त्याने शेतातील जमिनीमध्ये लपवून ठेवलेले 4 लाख 15 हजार रुपयांचे 9070 ग्रॅम वजनाचे दागिने व 15 हजार 630 रुपये रोख जप्त करण्यात आले. इतर आरोपींचा शोध घेत असताना 21 जानेवारी रोजी हिंमतसिंह बालिया, लोकेंदर राजपुत, प्रल्हादसिंह चौहान, यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 66 लाख 40 हजार रुपयांचे 1440 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

 

यातील काही आरोपी मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) येथे असल्याची माहिती मिळाल्यावर हे पथक तातडीने इंदौर येथे रवाना झाले. त्यातील मुख्य आरोपी फिर्यादीचा नोकर गणेशकुमार देवासी याला इंदौर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून राजस्थान येथे ठेवलेले 1 कोटी 78 लाख 89 हजार 213 रुपयांचे 3878 ग्रॅम वजनाचे दागिने व 2 लाख 52 हजार रुपये इतकी मालमत्ता हस्तगत केली.

 

या आरोपींना आश्रय देणारे व त्यांच्याकडून चोरीचा माल घेणारे श्यामलाल सोनी, विक्रमकुमार मेघवाल,
उत्तम धांची यांना अटक करुन त्यांच्याकडून 48 लाख 65 हजार 330 रुपयांचे 1054 ग्रॅम सोन्याचे दागिने
व 75 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून सरवन कालुराम घांची व विरेंद्र ऊर्फ वीरु प्रतापराम भाट
यांचा पोलीस शोध घेत आहे. या गुन्ह्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 8 कोटी 19 लाख 67 हजार 871 रुपयांची मालमत्ता चोरीस गेली होती.
त्यापैकी 7 कोटी 12 हजार 60 हजार रुपयांचे दागिने व रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Jt CP Vishwas Nangre Patil), अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत (Addl CP Dilip Sawant),
पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी (DCP Dr. Saurabh Tripathi) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त समीर शेख,
पोलीस निरीक्षक ओम वगाटे यांनी प्रत्यक्ष राजस्थान, गुजरात (Gujarat),
मध्य प्रदेश येथे 14 दिवस कौशल्यपूर्ण तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई (Senior Police Inspector Jyoti Desai) यांच्या सहकार्याने सहायक पोलीस निरीक्षक नितीन कदम,
उपनिरीक्षक प्रदिप लाड, उगले, विनोद पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन गुन्हा उघडकीस
आणून मुंबई पोलिसांचे नावलौकिकास साजेशी कामगिरी केलली आहे.
मुंबई पोलिसांनी तपासात दाखविलेली कौशलता व कार्यतत्परता तसेच गुन्ह्यातील आरोपींकडून चोरीस गेलेली
90 टक्के मालमत्ता हस्तगत केल्याने व्यापार्‍यांनी तसेच फिर्यादी खुशाल टामका यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे.
हे पथक मुंबईत आले तेव्हा व्यापारी व नागरिकांनी त्यांच्यावर फुले उधळून त्यांचे स्वागत केले.

 

Web Title :- Mumbai Crime | 10 accused arrested from Rajasthan, Madhya Pradesh, Rs 7 crore seized; The servant was accompanied by his companions carrying gold ornaments

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांची संख्या घटली मात्र मृतांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 45,648 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Blood Sugar Level | मधुमेहाच्या रूग्णांसाठी खुप उपयोगी आहे ‘ही’ एक गोष्ट, ब्लड शुगर लेव्हल सुद्धा राहते नियंत्रित; जाणून घ्या कशी

 

Random Blood Sugar Level | 130 mg/dl पेक्षा जास्त शुगर लेव्हल ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या वयानुसार किती असावी ब्लड शुगर लेव्हल