Random Blood Sugar Level | 130 mg/dl पेक्षा जास्त शुगर लेव्हल ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या वयानुसार किती असावी ब्लड शुगर लेव्हल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Random Blood Sugar Level | मधुमेही (Diabetes) रुग्णांसाठी साखरेची पातळी वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी धोकादायक असतात. साखरेची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack), किडनी (Kidney) निकामी होणे, ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आणि एकाधिक अवयव निकामी होणे यासारख्या जीवघेण्या स्थितीचा धोका वाढतो. शुगर लेव्हल (Sugar Level), आहार (Diet) आणि ताणतणाव (Tress) यांची वेळोवेळी तपासणी केल्याने त्याच्या पातळीवर खूप परिणाम होतो. (Random Blood Sugar Level)

 

परंतु एखाद्या व्यक्तीसाठी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की त्याच्यासाठी रक्तातील साखरेची सामान्य पातळी किती असावी. कधीकधी एखाद्या व्यक्तीचे वय देखील रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करते. अशा स्थितीत वयानुसार रक्तातील साखरेची पातळी काय असावी हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

 

फास्टिंग दरम्यान :
फास्टिंग दरम्यान, रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl दरम्यान असते. परंतु जर फास्टिंगच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण 100-126 mg/dl च्या दरम्यान असेल तर त्याला प्री-डायबेटिस म्हणून वर्गीकृत केले जाते. मात्र, जर ही पातळी 130 mg/dl किंवा त्याहून अधिक असेल तर ती अत्यंत धोकादायक मानली जाते.

 

खाल्ल्यानंतर 2 तासानंतर :
जेवणानंतर 2 तासांनी रक्तातील साखरेची पातळी 130-140 mg/dl दरम्यान असावी. मात्र ही पातळी वाढत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते. जेवणाच्या 2 तासांनंतर जर रक्तातील साखरेची पातळी 200-400 mg/dl च्या दरम्यान असेल तर ती अत्यंत धोकादायक पातळी मानली जाते. अशा स्थितीत रक्तातील साखरेची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. (Random Blood Sugar Level)

6 वर्षे ते 12 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 80 ते 180 mg/dl असावी, तर प्रँडियल शुगरची लेव्हल 140 mg/dL असावी, तर रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 180 mg/dl असावी.

 

13 वर्षे ते 19 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 70 ते 150 mg/dl असावी, तर प्रॅन्डियल शुगर लेव्हल 140 mg/dL, तर जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी 90 ते 150 mg/dl असावी.

 

20 वर्षे ते 26 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 100 ते 180 mg/dl असावी, तर प्रँडियल शुगरची लेव्हल 180 mg/dL असावी, तर रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 100 ते 1140 mg/dl असावी.

27 वर्षे ते 32 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग शुगर लेव्हल 100 mg/dl असावी, तर प्रँडियल शुगरची लेव्हल 90-110 mg/dL असावी,
तर रात्रीच्या जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी 100 ते 140 mg/dl असावी.

 

33 ते 40 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 140 mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे, प्रँडियल शुगर लेव्हल 160 mg/dl पेक्षा कमी असावी,
तर जेवणानंतीची ब्लड शुगर लेव्हल 90 ते 150 mg/dl असावी.

 

40 ते 50 वर्षे वयोगट :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 90 ते 130 mg/dL असावी, तर प्रँडियल शुगर लेव्हल 140 mg/dl पेक्षा कमी असावी,
तर जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी 150 mg/dl असावी.

 

50 ते 60 वर्षे वय :
या वयात फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल 90 ते 130 mg/dL असावी, तर प्रँडियल शुगर लेव्हल 140 mg/dl पेक्षा कमी असावी,
तर जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी 150 mg/dl असावी.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Random Blood Sugar Level | what should be the random blood sugar level know how much blood sugar level should be according to age

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMRDA Draft Development Plan | पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत; शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यासह माजी नगरसेवक अजित आपटे यांचा समावेश

 

Sambhaji Bhide | संभाजी भिडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘…तर मी मंत्रीपदावर थुंकतो, असं म्हणून एकही मंत्री बाहेर पडला नाही’

 

Pune Crime | दोन वर्षापासून फरार असलेल्या पिंटू मारणे टोळीचा मुख्य सुत्रधार गुन्हे शाखेकडून गजाआड