Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांची संख्या घटली मात्र मृतांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 45,648 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आज राज्यात कोरोना मृतांचा आकडा शंभरी पार गेला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) 24 हजार 948 नव्या रुग्णांची भर पडली असून 103 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राज्यात आज 110 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली आहे.

 

राज्यात आज 45 हजार 648 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 72 लाख  42 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.61 टक्के झाले आहे. राज्यात आज 103 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.86 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 41 लाख 63 हजार 858 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 76 लाख 55 हजार 554 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.27 टक्के आहे.
सध्या 02 लाख 66 हजार 586 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 14 लाख 61 हजार 370 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :-  Coronavirus in Maharashtra | corona 45,648 patients Discharge in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | संतापजनक ! कंपनीतील महिलेसोबत अश्लील चाळे, असिस्टंट मॅनेजरला अटक

 

Random Blood Sugar Level | 130 mg/dl पेक्षा जास्त शुगर लेव्हल ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या वयानुसार किती असावी ब्लड शुगर लेव्हल

 

Pune-Pimpri Corona Updates | पुणेकर, पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा ! दिवसभरात 13 हजाराहून अधिक रूग्ण ‘कोरोना’मुक्त