Mumbai Crime News | धक्कादायक! ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांचा 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

0
178
Mumbai Crime News | 20 year old girl raped by two laborers by offering autorickshaw lift in panvel
file photo

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | राज्यात महिलांवरील आत्याचार (Women’s Violence) काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. पनवेलमध्ये अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑटोरिक्षातून घरी सोडण्याच्या बहाण्याने दोन मजुरांनी एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape in Panvel) केला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक (Arrest) केली आहे. (Mumbai Crime News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित तरुणी खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये वेट्रेस म्हणून कामाला आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री ती कामावरून परतताना पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली होती. जेवण झाल्यानंतर ती घरी जाण्यासाठी हॉटेलसमोर ऑटोरिक्षाची वाट बघत होती. तेवढ्यात आरोपी अविनाश चव्हाण (22) आणि सूरज देवडे (21) त्या ठिकाणी आले. दोघांनी तरुणीजवळ जाऊन ‘एवढ्या रात्री रस्त्यावर एकटीने थांबणे योग्य नाही. आमची ऑटो हॉटेलच्या मागे आहे. आम्ही तुम्हाला घरी सोडतो’, असे सांगितले. (Mumbai Crime News)

 

यानंतर त्या तरुणीने बराच वेळ ऑटोची वाट बघितली पण ती न मिळाल्याने तरुणीने त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरोपींनी निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने पडक्या इमारतीत नेले. यानंतर आरोपींनी त्या ठिकाणी तिला मारहाण करत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला त्या ठिकाणी घटनास्थळी सोडून पळ काढला. यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 24 तासांच्या आतमध्ये पनवेलमधील एका चाळीतून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पनवेल पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Mumbai Crime News | 20 year old girl raped by two laborers by offering autorickshaw lift in panvel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू