Mumbai Crime News | मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले; मुंबईमधील घटना

0
174
Mumbai Crime News | hit and run near worli sea face women died on spot driver arrested
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Mumbai Crime News | मुंबईमधील वरळी सी फेस जवळ हिट अँड रनची एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. या अपघातात (Accident) त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कारचालकाला अटक केली आहे. मृत पावलेल्या महिलेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Mumbai Crime News)

 

काय घडले नेमके?
मृत महिला हि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी अचानक एका भरधाव कारने या महिलेला जोराची धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या महिलेला उपचारासाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Mumbai Crime News)

 

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपी कारचालकदेखील या अपघातात मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी आरोपी कारचालकाची कसून चौकशी सुरु आहे. महिलेला चिरडल्यानंतर कारने रस्त्याशेजारी असलेल्या कठड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

Web Title :- Mumbai Crime News | hit and run near worli sea face women died on spot driver arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला

Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले

Pune Crime News | मेफेड्रोन, चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त