थरार ! ५ मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन् विमान अवकाशात, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर विमानांचे अपघात होत असतात. मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा विमानातील प्रवाशांनी देखील अशाच प्रकारचा अनुभव घेतला. या विमानातील इंधन संपल्याने १५३ प्रवाशांचा जीव धोक्यात होता. विमानात फक्त पाच मिनिटे पुरेल इतकेच इंधन बाकी होते. त्यामुळे हे विमान कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर या विमानाने पहिल्यांदा लखनऊ गाठले. त्यानंतर पुन्हा हे विमान प्रयागराजला गेले. प्रयागराजवरून पुन्हा हे विमान लखनऊला गेले. मात्र तिथे गेल्यानंतर अंधुक प्रकाश असल्याने लँडिंग करण्यास अडचण निर्माण झाली. ज्यावेळी हे विमान लँड करण्यात आले त्यावेळी या विमानात जवळपास शून्य टक्के इंधन होते.

ए ३२० UK ९४४ या विमानाने मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण भरले. यावेळी विमानात ८ हजार ५०० किलो इंधन होते. यामुळे लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे आणि पायलटच्या सतर्कतेमुळे या विमानाचा अपघात टळला. या विमानात पुरेसे इंधन नसताना देखील या विमानाने उड्डाण केले होते. ज्यावेळी हे विमान उतरले त्यावेळी या विमानात फक्त २०० किलोग्रॅम म्हणजे फक्त ५ मिनिटे विमान चालू राहील इतकेच इंधन शिल्लक होते.

दरम्यान, विमान प्राधिकरणाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आता या निष्काळजीपणाबद्दल विमान कंपनी काय करणार हे पाहणे महत्वाचे आहे. अशाप्रकारे विमानात इतक्या कमी प्रमाणात इंधन असताना विमानाचे लँडिंग होणे म्हणजे एक चमत्कारच असल्याचे मत एका जेष्ठ वैमानिकाने व्यक्त केलं.

आरोग्यविषयक वृत्त

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी