CCTV मुळे ‘पर्दाफाश’ : नायर रुग्णालयातून नवजात ५ दिवसाचे चोरीला गेलेले ‘बाळ’ सापडले ; महिलेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नायर रुग्णालयातून गुरुवारी सायंकाळी चोरीला गेलेल्या पाच दिवसांच्या बाळाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून या बाळाला पळविणाऱ्यां महिलेला अग्रीपाडा पोलिसांनी सांताक्रुझमधील एका रुग्णालयातून ताब्यात घेतले आहे. अवघ्या ५ तासात बाळाला शोधण्यात पोलिसांना यश आले.

नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७ मधून काल सायंकाळी हे मुल चोरीला गेले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एक महिला बाळ चोरुन नेत असल्याचे आढळून आले. उत्तम दर्जाच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे या महिलेची लगेचच ओळख पटली. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनीही या महिलेविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. त्या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. हे बाळ सुखरुप असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

नायर रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी ७ नंबरचा वॉर्ड आहे. या ठिकाणी एक महिला ५ दिवसांच्या बाळासह झोपली होती. तिला जाग आल्यावर शेजारी बाळ नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आजूबाजूला शोध घेतला तेव्हा ते मिळून आले नाही. आग्रीपाडा पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा सायंकाळी आकाशी रंगाचे कपडे घातलेली एक महिला मुलाला उचलून घेऊन जाताना दिसली होती. त्यावरुन तिचा शोध घेण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य काळजी घेतली तर ‘हा’आजार होणार नाही,तुम्ही राहा अलर्ट

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

किचनमधील ‘या’ ९ भाज्यांचा ‘व्हायग्रा’सारखाच परिणाम

शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT)आधुनिक रक्ततपासणी आवश्यक