‘गिझर’ने पाणी तापवून ‘अंघोळ’ केल्याने मुलीचा ‘मृत्यू’, डॉक्टरच्या ‘रिपोर्ट’मध्ये धक्कादायक ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – थंडीमुळे सध्या देशातील जास्तीत जास्त घरांमध्ये गिझर लावले जाते, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की गिझर हे किती प्राणघातक आहे. अशीच एक आश्चर्यकारक घटना मुंबईच्या बोरिवली पश्चिम गोराई इलाक्यात घडली असून गिझरमधून निघणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने एका १५ वर्षीय मुलीचा बाथरूममध्ये मृत्यू झाला आहे. या मुलीचे नाव ध्रुवी गोहिल असे आहे.

डॉक्टरच्या रिपोर्ट मध्ये झाला खुलासा

जेव्हा कुटुंबाच्या लक्षात आले की तिला आंघोळीला जाऊन खूप वेळ झाला तरी ती बाहेर येत नाही तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला. जेव्हा त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडला तर ध्रुवी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. गरम पाण्यामुळे तिच्या शरीराचा उजवा भाग जळाला होता. ते म्हणाले, गिझरमधून कार्बन मोनो ऑक्साईड गॅस बाहेर पडल्याने ध्रुवी बेशुद्ध झाली. बाथरूममध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे तिच्या मेंदूवर त्याचा परिणाम झाला आणि तिचा मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या अहवालानुसार गिझरमधून गॅस बाहेर पडल्याने ध्रुवीचा मृत्यू झाला आहे.

जन्मदिनाच्या दिवशीच झाला मुलीचा मृत्यू

दुर्दैवाने ध्रुवीचा वाढदिवस होता त्याच दिवशी तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. ध्रुवीचे वडील राजीव गोहिल यांनी सांगितले की त्यांना एकुलती एक मुलगी आहे जी खूप हुशार होती आणि आता ती जग सोडून गेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/