Mumbai High Court | आत्महत्येचा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात बदलू शकत नाही – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court | विवाहितेला आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु व दीर यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आयपीसी 306, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 12 नोव्हेंबर 2014 रोजी घडली होती. विवाहितेचा मृतदेह विहीरीमध्ये तरंगताना आढळून आला होता. (Mumbai High Court)

या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना डॉक्टरांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच्या वकिलांमार्फत हा गुन्हा आत्महत्येचा नसून खुनाचा गुन्हा असल्याबाबत व खून केल्या प्रकरणी आयपीसी 302 चे कलम वाढवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सत्र न्यायालय, पुणे यांनी आदेश करुन आयपीसी 302 च्या कलमाचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारित केले.

पुणे सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आरोपी गुरुदास बाळासाहेब राऊत व इतरांनी अॅड. प्रताप परदेशी व अॅड. अभिषेक अवचट यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष व इतर साक्षीदारांचे जबा-जबाब याच्या आधारे या प्रकरणात आयपीसी 302 म्हणजेच खून केल्याचे आरोप लावण्याइतपत पुरावा उपलब्ध नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन पुणे सत्र न्यायालयाने केलेले खुनाच्या गुन्ह्याचे कलम रद्द केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवीण येणपुरे टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 113 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे तरुणाने गमावला जीव; दोघांना अटक

Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR

Maharashtra Cabinet Decision | अयोध्येतील प्राणप्रतिष्ठानिमित्त सवलतीच्या दरात ‘आनंदाचा शिधा’, मंत्रिमंडळाने घेतले ९ महत्वाचे निर्णय

Pune Pimpri Chinchwad Crime News | डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न, विश्रांतवाडी परिसरातील घटना; सराईत गुन्हेगार गजाआड