Mumbai High Court on Sanjay Raut | संजय राऊतांच्या विधानावर हाय कोर्टाचे खडेबोल; म्हणाले – ‘टीका झेलण्यासाठी आमचे खांदे मजबूत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai High Court on Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांनंतर करण्यात आलेल्या न्यायालय (Bombay High Court) अवमान याचिकेची तातडीने सुनावणी घ्यावी, अशा अर्जाचा विचार करत असताना मुंबई हाय कोर्टाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता (Chief Justice Dipankar Datta) यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘टीका झेलण्यासाठी आमचे खांदे मजबूत आहेत.’ असं हाय कोर्टाने बुधवारी म्हटलं आहे.

 

”टीका झेलण्यासाठी आमचे खांदे मजबूत आहेत. त्यांना (राजकारणी) जे काही बोलायचे असेल ते बोलू द्या.
जोपर्यंत आमची सद्सदविवेकबुद्धी शाबूत आहे, तोपर्यंत आम्हाला अशा वक्तव्यांनी फरक पडत नाही,” असे परखड बोल न्यायालयाने केले आहे.

 

नेमकं प्रकरण काय ?
‘आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात (INS Vikrant Fund Embezzlement Case) आरोपी असलेले भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना हाय कोर्टाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने अटकेपासून हंगामी दिलासा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायालयाबद्दलच आक्षेपार्ह भाष्य केलं होतं.
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा संबंध असलेल्या दैनिक सामनामध्ये लेख देखील लिहिला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) यांनी देखील संजय राऊत यांच्या विधानाचे समर्थन केले.
या पार्श्वभूमीवर ‘इंडियन बार असोसिएशनने (Indian Bar Association) न्यायालय अवमान कायद्यांतर्गत कारवाई करावी,’
अशी विनंती करणारी अवमान याचिका दाखल केली आहे.

 

Web Title :- Mumbai High Court on Sanjay Raut | bombay mumbai high court on shiv sena leader sanjay raut accusations courts giving favor to bjp leaders

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा