NRC आणि CAA च्या पार्श्वभूमीवर मुंबईपोलिस आयुक्तांचं ‘मोठं’ विधान, म्हणाले…

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NRC आणि CAA वरून देशात वातावरण तापले आहे. एनआरसी आणि सीएएच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनाला देशातील अनेक राज्यातील शहरांमध्ये हिंसक वळण लागले. त्यामुळे अनेक ठिकाणी वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देशभर मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. हा विरोध करणाऱ्यांमध्ये मुस्लिम संघटना अग्रेसर आहेत. माझा जन्म इथलाच असला तरी सध्या माझ्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नाही. योग्य वेळी मी ते सिद्ध करणार आहे. जर मला घाबरण्याच कारण नाही तर मुसलमानांनाही घाबरण्याचे कारण नसल्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मगुरुंनी आज (बुधवार) मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेऊन चर्चा केली. पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरु आणि मुस्लिम नेत्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. याप्रकरणी काही समाजकंटक मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडू नका असे आवाहन आयुक्त संजय बर्वे यांनी यावेळी केले.

पोलीस आयुक्त संजय बर्वे म्हणाले, एनसीआर विषयी अजुनही कुठलाही आदेश आलेला नाही किंवा काही माहितीही आलेली नाही. एनसीआर आणि सीएए मुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. देशातल्या मुस्लिम किंवा कुठल्याही नागरिकाला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. काही लोक जाणीवपूर्वक भीती पसरविण्याचे काम करत आहेत. ही मंडळी कोण आहेत याची माहिती पोलिसांकडे आहे. गरज पडल्यास ही माहिती जाहीर करण्यात येईल. काही संघटना आणि लोक विरोधासाठी रॅलीची परवानगी मागण्यासाठी आमच्याकडे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधासाठी रॅलीची परवानगी मागण्यासाठी येणारे हे कोण लोक आहे, आणि त्यांचा उद्देश काय आहे याची पोलिसांना चांगली माहिती आहे. शुक्रवारच्या प्रार्थनावेळी देशाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करा असे आवाहन त्यांनी सर्व धर्मगुरुंना केले. बर्वे पुढे म्हणाले की, माझा जन्म इथलाच असला तरी सध्या माझ्याकडे जन्माचं प्रमाणपत्र नाही. योग्य वेळी मी ते सिद्ध करणार आहे. जर मला घाबरण्याच कारण नाही तर मुसलमानांनाही घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/