विमानात अभिनेत्रीचा विनयभंग करणारा व्यावसायिक सचदेवा ‘दोषी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विमान प्रवासादरम्यान एका अभिनेत्रीचा विनयभंग केल्याप्रकरणी व्यावसायिक विकास सचदेवा याला मुंबईतील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान विकास सचेदेवा याला दोषी ठरवण्यात आले. हा प्रकार डिसेंबर 2017 मध्ये घडला होता. सचदेवा याच्यावर विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुंबईतील विशेष न्यायालयाने व्यावसायिक विकास सचदेवा (वय-41 रा. पवई) याला पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि कलम 354 अंतर्गत दोषी ठरवलं आहे. सचदेवा याने विमान प्रवासादरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. 9 डिसेंबर 2017 रोजी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विमान प्रवासादरम्यान अभिनेत्रीसोबत हा प्रकार घडला होता. त्यानंतर तिने याचा व्हिडिओ इस्टाग्रामवर शेअर केला. दिल्लीहून मुंबईला विमानाने येत असताना तिच्यासोबत तिची आई देखील होती. बिझनेस क्लासच्या तिकीटावर अभिनेत्री आणि तिची आई प्रवास करत होत्या. तिच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तिच्या पाठीला स्पर्श झाला. याबाबत तिने त्याला सांगितले मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. हा प्रकार सुरुच राहिल्याने ती किंचाळली. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्याचा तिने प्रयत्न केला मात्र विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. अभिनेत्रीने तिच्या सोबत घडलेला प्रकार इस्टाग्रामवर सांगून व्हिडिओ शेअर केला. या प्रकाराची मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेत सचदेवा याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली मात्र, त्याची जामीनावर सुटका झाली.

आरोपी सचदेवाचे न्यायालयात स्पष्टीकरण
सचदेवा याने विशेष न्यायालयात स्पष्टीकरण दिले होत. विमानातील बिझनेस क्लासमधून प्रवास करत होतो. दिल्लीत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईत परत आलो होतो. विमानात बसल्यानंतर झोप लागली. मध्यरात्री घरी पोहचल्यानंतर या घटनेबाबत समजलं. दुसऱ्या दिवशी मी बाहेर गेलो होतो. घरी आल्यानंतर पत्नीने पोलीस घरी आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं. घटनेबाबत सांगून गुन्हा दाखल केला असं अटक केल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like