धोनी आणि अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी ; एकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्या महाभागाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीसांनी अमीर उल्ला शेख नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती क्रेन ड्राइवर असून तो उत्तर प्रदेशामधील गोरखपूर येथील रहिवाशी आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या महितीनुसार महेंद्र सिंह धोनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा आरोपी मानसिक रुग्ण आहे. तो मागील ११ महिन्यांपासून त्यासंबंधित उपचार घेत आहे. पोलीस आधिक माहितीसाठी या आरोपीकडून माहिती काढून घेत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

बुधवारी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसवर शालीमार एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या स्फोटकांनंतर आणि मुंबईतील उरण येथे आयएसआयएस संबंधित लिखित संदेश मिळाल्याच्या घटनेनंतर पोलीस आणि रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध मोहिमा राबवल्या आहेत.

संबंधित आरोपीबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. थेट मुख्यमंत्री केजरीवाल आणि प्रसिद्ध क्रिकेटर धोनीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस संबंधिताची कसून चौकशी करत आहेत.