Mumbai NCB | NCB ने अटक केलेल्या आरोपीचा कारागृहात मृत्यू; प्रचंड खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai NCB | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाकडून (Mumbai NCB) नांदेडमध्ये (Nanded) 100 किलो अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. ही कारवाई 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या कारवाईत एनसीबीने (NCB) चार आरोपीना अटक (Arrested) केली होती. यापैकी एका आरोपीचा कारागृहात मृत्यू (Died) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्रसिंग भुल्लर (Jitendrasingh Bhullar) असं कारागृहात मृत्यु (Died) पावलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

नांदेड शहराजवळील (City of Nanded) बोंढार शिवारात छापा मारला होता. यावेळी 100 किलो पोपीस्ट्रॉ आणि दीड किलो अफीमचा साठा मिळून आला होता. यावेळी 4 आरोपीना अटक केली होती. चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत नांदेडच्या कारागृहात आहेत. त्यापैकी एकाचा सध्या मृत्यु झाला आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सोबतच्या कैद्यांनी आवाज दिल्यानंतर जितेंद्रसिंघ हालचाल करत नव्हता. कारागृह अधीक्षकांना याबाबत माहिती समजल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रात्रीच्या दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. जितेंद्रसिंघ यांचे कॅमेरा शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदन रिपोर्ट (Autopsy report) आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे. (Mumbai NCP)

दरम्यान, मुंबई एनसीबीच्या पथकाने (Mumbai NCB squad) नांदेडमध्ये गांजा घेऊन जाणारा ट्रक पकडला होता. आंध्रप्रदेश मधील विशाखापटणम येथून गांजा महाराष्ट्रात येणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीवरुन मुंबई NCB चे पथक नांदेडमध्ये दाखल झाले. नांदेड मधील देगलुर येथून गांजा भरून जाणारा ट्रक निदर्शनास आला. एनसीबीच्या पथकाने पाठलाग करत हा ट्रॅक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 101 किलो गांजा आढळला. गांजा घेऊन हा ट्रक जळगाव येथे जाणार होता. त्यावेळी ट्रक चालक गोकुळ नारायण राजपूत (Gokul Narayan Rajput) आणि सुनिल यादव महाजन (Sunil Yadav Mahajan) यांना एनसीबीच्या पथकाने (NCB Squad) ताब्यात घेतलं त्यानंतर डोडा पावडर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारत तेथुन एकाला अटक केलं होतं.

 

Web Title :- Mumbai NCB | mumbai ncb arrested accused dies in jail at nanded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PPF Account मुलांपासून मोठ्यांच्या नावाने उघडता येते, NSC पेक्षा मिळते जास्त व्याज; RD पेक्षा सुद्धा याबाबतीत चांगले

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Customers Alert | ‘एसबीआय’च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे ! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गाईडलाईन