रिपब्लिक TV नं पैसे देऊन विकत घेतली TRP, इतर 2 न्यूज चॅनलचं देखील नाव : मुंबई पोलिस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीसांच्या क्राइम ब्रँचच्या टीमने फ्रॉड टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलीस कमिश्नर परमवीर सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, बार्कच्या तक्रारीनंतर क्राइम ब्रँचच्या टीमला तपासात फ्रॉड टीआरपीच्या रॅकेटची माहिती मिळाली. या रॅकेटद्वारे टीआरपी मॅनुप्युलेट केला जात होता. सिंह म्हणाले, याद्वारे फेक अजेंडा चालवला जात होता.

परमवर सिंह म्हणाले की, या रॅकेटमध्ये आतापर्यंत तीन न्यूज चॅनलचे नाव समोर आले आहे, ज्यामध्ये दोन छोटे मराठी न्यूज चॅनल आहेत, ज्यामध्ये एक आहे फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा. याशिवाय रिपब्लिक टीव्हीचे नावसुद्धा समोर आले आहे. परमवीर सिंह यांनी सांगितले की, या दोन मराठी चॅनल्सच्या मालकांना गुरूवारी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी म्हटले की, याबाबतीत इतर कोणत्याही चॅनलचे नाव आले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.

असे काम करते रॅकेट
मुंबई पोलीस कमिश्नरने म्हटले की, अशी माहिती मिळाली होती की, पैसे देऊन टीआरपी मॅनेज करण्यात आला, ज्यामध्ये हंसा नावाच्या एका कंपनीचे नावसुद्धा समोर आले आहे. हंसा कंपनी बार्कचे काम पहाते. यामुळे हंसाच्या एका कर्मचार्‍याला अटक केली आहे. लोकांना 400 ते 500 रुपये महिन्याच्या हिशेबाने दिले जात होते आणि त्यांना सांगितले जात होते की, त्यांनी ठरलेल्या विशेष चॅनलला टीव्हीवर सतत सुरू ठेवावे, अगदी ते घरात असतील किंवा नसतील तरी सुद्धा.

परमवीर सिंह यांनी सांगितले की, या चॅनलच्या जाहिरातदारांशी चौकशी करण्यात येईल. रिपब्लिक टीव्हीच्या बँक अकाऊंटची चौकशी होईल, अ‍ॅडव्हाटायर्सकडून मिळालेल्या पैशांची चौकशी होईल, जर काही आक्षेपार्ह असेल तर अकाऊंट फ्रीज केली जाऊ शकतात.

अर्णब गोस्वामीच्या चौकशीवर कमिश्नरने दिले ÷उत्तर
पोलीस कमिश्नरने सांगितले की, या घोटाळ्याबाबत हंसा कंपनीकडून माहिती देण्यात आली होती, ज्यामध्ये हंसाचे काही माजी कर्मचारी आणि काही विद्यमान कर्मचारी यांचे संगनमत समोर आले आहे.

रिपब्लिक टीव्हीचा एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामीला चौकशीसाठी बोलवण्याबाबत प्रश्न विचारला असता परमवीर सिंह म्हणाले की, जो कुणी या घोटाळ्यात सहभागी असेल, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल आणि पुढे योग्य ती कारवाई केली जाईल. परमवीर सिंह यांनी म्हटले की, रिपब्लिक टीव्हीच्या काही लोकांना आज किंवा उद्या समन्स मिळेल.