Mumbai Police Constable Murder | पत्नी आणि मुलीनेच केला पोलीस कर्मचार्‍याचा निर्घृण खून, धक्कादायक कारण आलं समोर

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा खून (Mumbai Police Constable Murder) झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मधील (Kalyan East) कोळसेवाडी परिसरात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलचा खून (Mumbai Police Constable Murder) त्याच्या पत्नी आणि मुलीने (Wife and Daughter) केल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि मुलीने खलबत्याने ठेचून खून केला.

प्रकाश बोरसे (Prakash Borse) असे खून झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे (Mumbai Police Constable Murder) नाव आहे. ते मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. बोरसे यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. मात्र, ती सासरी नांदत नाही म्हणून घरात मागील काही दिवसांपासून वाद सुरु होते. याच वादातून पत्नी ज्योती बोरसे (Jyoti Borse) आणि मुलगी भाग्यश्री (Bhagyashree) हिने खलबत्याने ठेचून बोरसे यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बोरसे हे मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात (Kurla Police Station) पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
त्यांचा घरगुती वादातून (Domestic Disputes) पत्नी आणि मुलीने खून केला.
प्रकाश बोरसे हे कोळसेवाडी पवाशे नगर परिसरात राहत होते.
त्यांची मुलगी भाग्यश्री हीचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते.
परंतु ती पतीसोबत नांदत नव्हती. यावरुन प्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होत होते.
गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला.
यानंतर रागाच्या भरात पत्नी आणि मुलीने त्यांच्या डोक्यात खलबत्याने प्रहार करुन त्यांचा खून केला.
पत्नी आणि मुलीवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

Web Title :-  Mumbai Police Constable Murder | Mumbai police constable murdered by his wife and daughter in kolsewadi area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | ‘राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या, लॉकडाउनच्या धमक्या’

 

TET Exam Scam | टीईटी पेपर गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांकडून दोन शासकीय कर्मचाऱ्यांना अटक

 

Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा