Mumbai Politics | मुंबईतील विद्यमान खासदारांचे पत्ते कट होणार? भाजपकडून मोठ्या फेरबदलाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Politics | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप (BJP) विरोधी गटाने स्वतंत्र आघाडी तयार करुन भाजपला मोठे आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे. यातच आता आगामी निवडणुकीमध्ये भाजप (Mumbai Politics) मुंबईतील उमेदवारांमध्ये बदल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप येत्या काळात काहीतरी मोठे बदल करुन शकतो. मुंबई मधून भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) किंवा विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यापैकी एकाला लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याशिवाय माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. 2019 मध्ये मातोश्रीची नाराजी असल्याने किरीट सोमय्या यांचे तिकीट भाजपने कापले होते. परंतु आता शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्याने किरीट सोमय्या यांना येत्या काळात पुन्हा एकदा खासदार बनणण्याची संधी मिळू शकते का? हे पहावे लागले. (Mumbai Politics)

मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर भाजप विजयी झाला आहे.
तर दोन जागांवर भाजप आपले उमेदवार बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’